Chakan : चाकणला बोकड बाजारात मोठी उलाढाल ; विक्रीसाठी 3 हजार बोकड

बकरी ईद तोंडावर ; विक्रीसाठी 3 हजार बोक

एमपीसी न्यूज- अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील शेळ्या-मेंढ्या आणि बोकड बाजारात कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची खरेदी-विक्री जोरात सुरु झाली आहे.

शनिवारी (दि.11) येथील बाजारात विक्रीसाठी आलेल्या 3 हजार बोकडापैकी 2 हजार बोकडांची विक्री होऊन तब्बल 10 हजार ते 50 हजार रुपयांचा भाव बोकडांना मिळाला. बोकड बाजारामुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची या बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढली असून मार्केट फीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.