Chakan Crime News : कंपनीच्या गोडाऊन मधून तब्बल पावणे आठ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडाऊन मधून तब्बल सात लाख 69 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 15) सकाळी सोनवणे वस्ती, कुरुळी येथे ‘ग्रॅब सर्व्हिस प्रा. ली.’ या कंपनीत उघडकीस आली.

प्रमोद पांडुरंग खैरे (वय 23, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कुरुळी येथील ‘ग्रॅब सर्व्हिस प्रा. ली.’ या कंपनीच्या समोरील शटरचे लॉक उघडून गोडाऊन मध्ये प्रवेश केला. गोडाऊन मधील लॉकर मध्ये ठेवलेली सात लाख 69 हजार 90 रुपये रोख रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) रात्री साडेनऊ ते बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.