Chakan : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिलांनी मध्यरात्री बारा वाजता चाकण (ता. खेड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

शुक्रवारी दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात अनुयायी, नागरिकांनी आदरांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती. चाकण नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.