Chakan : हज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्दिकी यांची महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे इम्रान मुजावर यांचीही याच कमिटीवर सदस्यपदी निवड करण्यात आल्याने चाकण मधील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी भाजप अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष व चाकणचे माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, इम्रान शेख, रफिक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.