Chakan : गतिमंद मुलीवर मामाने केला बलात्कार

0 424

एमपीसी न्यूज – घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरात घुसून अल्पवयीन गतीमंद मुलीवर मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास घरच्यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी देत पिडितेला मारहाण देखील करण्यात आली.

HB_POST_INPOST_R_A

याप्रकरणी चाकण पोलिसांनी 46 वर्षीय मामाला अटक केली आहे. याबाबत 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसह चाकण येथे राहते. तिचे वडील शेतकरी आहेत. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी आजारामुळे निधन झाले होते. मुलीची जबाबदारी वडिलांवर होती.  दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील शेतात कामासाठी गेले होते. तर, पीडित मुलगी घरी एकटीच होती. यादरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पीडित मुलीच्या आत्याचे पती घरात पोहोचले. त्यांनी दरवाजा बंद करुन पीडित मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणाची वाच्यता केल्यास घरच्यांना कोयत्याने ठार मारु अशी धमकी देत पिडितेला मारहाण केली. महिला पोलीस अधिकारी एम.टी.शिंदे तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: