Chakan : माहेरहून फ्लॅट, पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेच्या छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्न झाल्यानंतर एक महिन्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये, एक फ्लॅट आणि पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट हुंडा म्हणून आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2016 ते 11 फेब्रुवारी 2020 या कालावधीत खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे घडला.

सुरेश बबन बोत्रे, बबन संभाजी बोत्रे, हिराबाई बबन बोत्रे, चंद्रकांत बबन बोत्रे, सुनीता चंद्रकांत बोत्रे (सर्व रा. खालूंब्रे, ता. खेड), रोहिणी अंकुश बोत्रे (रा. तळवडे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विवाहाच्या एक महिन्यांनंतर आरोपींनी माहेरहून पाच लाख रुपये, एक फ्लॅट आणि पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट हुंडा म्हणून आणण्याची मागणी केली. त्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेला अपमानास्पद बोलून शिवीगाळ केली.

तसेच उपाशी ठेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. घरातून निघून जाण्यासाठी धमकावत शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.