Chakan rain: चाकण परिसरात पावसाची संततधार, शेती कामांना वेग

एमपीसी न्यूज: आठवडाभराच्या विश्रांती नंतर चाकण परिसर आणि खेड तालुक्यात (जि.पुणे ) पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. (Chakan rain) तालुक्यातील धरण साखळीत पडणाऱ्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ सुरू झाली आहे. बुधवारी या भागात दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.

 

chakan paus

 

सोमवारी पावसाच्या या भागात हलक्या श्रावणसरी बरसल्या. मात्र मंगळवार पासून बहुतांश भागाला दमदार पावसाने झोडपले. चाकण शहर आणि परिसरात सोमवारी रात्री पासूनच पावसाची संततधार कायम आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावत आहे. पुढील दोन तास पावसाच्या दमदार सरी अशाच कायम राहण्याची शक्यता आहे.

Pune News : क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली

दरम्यान, आता भात लागवडी अंतिम टप्यात आल्या असून पुणे जिल्ह्याच्या भात पट्यात सरासरीच्या 59 हजार 627 हेक्टरपैकी 49 हजार 264 हेक्टर म्हणजेच 83 टक्के भाताच्या पुर्नलागवडी झाल्या असल्याचे कृषी विभागकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत भात लागवडी उरकण्याची शक्यता आहे.(Chakan rain) खेड तालुक्यात मजुरांची टंचाई असताना इर्जिक पद्धतीने देखील अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत. यंदा सुरुवातीच्या पावसावर काही भात लागवडी झाल्या होत्या. परंतु काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र आता भात लागवडी उरकत आल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.