BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : जबरी चोरीतील सराईताला अटक ; 17 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज- जबरी चोरीतील फरार आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली. चाकण एमआयडीसी परिसरात ही कारवाई केली असून त्याच्याकडून 17 गुन्हे उघडकीस आले.

ऋषिकेश रमेश सुरवसे (वय 29 रा. पवनानगर, रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथक हे चाकण पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार गणेश हजारे व आशिष बोटके यांना खबर मिळाली की पोलीस आयुक्तालय हद्दीतल जबरी चोरीतील फरार गुन्हेगार ऋशिकेष रमेश सुरवसे हा चाकण एमआयडीसी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे.

पोलीस तपासात त्याच्यावरील 17 गुन्हे उघड झाले असून सांगवी पोलीस ठाण्यातील चार, चिंचवड येथील चार, विश्रांतवाडी येथील तीन, हडपसर व कोथरूड येथील प्रत्येकी एक, पिंपरी पोलीस ठाण्यातील एक, चंदननगर वाकड येथील प्रत्येकी एक, चंतःश्रुंगी येथील एक असे गुन्हे दाखल असून यामध्ये चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, घरफोडी, दरोडयाची तयारी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3