Chakan : थकलेले भाडे मागणा-या घरमालकाला भाडेकरूची मारहाण

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे थकलेले भाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाला भाडेकरूने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास चक्रेश्वर रोड चाकण येथे घडली.

प्रवीण कदम असे जखमी घरमालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी पल्लवी कदम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित उर्फ आण्णा माने (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कदम यांचा चक्रेश्वर रोड चाकण येथे कांची इन्क्लेव्ह येथे फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांनी अमित माने याला भाड्याने दिला आहे. मागील काही दिवसांपासून अमितने भाड्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे प्रवीण त्याला भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेले. अमितने भाड्याचे पैसे दिले नाहीत. मात्र त्याने पैसे मागितल्याच्या रागातून प्रवीण यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये प्रवीण यांच्या डोक्यात, हातावर, पायावर गंभीर दुखापत झाली. ही भांडणे सोडवण्यासाठी पल्लवी कदम गेल्या असता त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.