Chakan : चाकण बाजारात रताळ्यांसह पालेभाज्या व फळभाज्यांचीही प्रचंड आवक; एकूण उलाढाल 2 कोटी, 60 लाख रुपये,.

एमपीसी न्यूज –   खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan)  चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये नवरात्रोत्सवाच्या उपवासांच्या पार्श्वभूमीवर रताळ्यांची प्रचंड आवक झाली आहे.  लसणाची आवक घटूनही भाव स्थिर राहिले, तर टोमॅटो, परवल व कांद्याचे भाव वाढले आहेत.

मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची देखील मोठी आवक झाली असून फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या- मेंढ्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल 2 कोटी, 60 लाख रुपये झाली आहे.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 600 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 400 क्विंटलने घटल्याने भावात 200 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 2300 रुपयांवरुन 2500 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 2100 क्विंटल झाली.

Pimpri : अखेर बेकायदा रुफटॉप हॉटेलवर कारवाई

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1900 क्विंटलने घटून बटाट्याचा कमाल भाव 1900 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमुग शेंगां व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 27 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने घटून लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 339 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 234 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयां पासून ते 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे 
कांदा – एकूण आवक – 600 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2500 रुपये, भाव क्रमांक 2. 1700 रुपये, भाव क्रमांक 3. 1000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 2100 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1900 रुपये, भाव क्रमांक 2. 1300 रुपये, भाव क्रमांक 3. 1000 रुपये.

 फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा (Chakan)  किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 330 क्विंटल ( 500 ते 700 रू. ), कोबी – 235 क्विंटल ( 500 ते 1000 रू.), फ्लॉवर – 23 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), वांगी – 83 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), भेंडी – 82 क्विंटल ( 2500 ते 3500 रु.), दोडका – 63 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), कारली – 72 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), दुधीभोपळा – 64 क्विंटल ( 1000 ते 3000 रु.),

काकडी – 80 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), फरशी – 42 क्विंटल ( 4000 ते 5000 रु.), वालवड – 46 क्विंटल ( 1000 ते 2000 रुपये), गवार – 64 क्विंटल ( 3000 ते 6000 रू.), ढोबळी मिरची – 160 क्विंटल ( 3500 ते 4500 रु.), चवळी – 32 क्विंटल ( 2500 ते 3500 रुपये.), वाटाणा – 35 क्विंटल ( 10000 ते 15000  रु.), शेवगा – 27 क्विंटल ( 5000 ते 7000 रुपये ), गाजर – 134क्विंटल ( 1500 ते 2500 रु.).

 पालेभाज्या –  
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 3 हजार 800 जुड्या ( 1500 ते 2500 रुपये,), कोथिंबीर – एकूण 19 हजार 650 जुड्या ( 500 ते 1500 रुपये,), शेपू – एकूण 2 हजार 430 जुड्या ( 1000 ते 1500 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 100 जुड्या ( 1500 ते 2000 रुपये),.

 जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी (Chakan)  आलेल्या 80 जर्शी गाईपैकी 50 गाईची विक्री झाली. ( 15000 ते 70000 रु.), 150 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली. ( 10000 ते 40000 रु.), 190 म्हशीपैकी 170 म्हशींची विक्री झाली.( 30000 ते 80000 रु.), 5500 शेळ्या – मेंढ्यापैकी 5000 शेळ्यांची विक्री झाली. ( 2000 ते 25000 रु.).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.