Chakan : कुरुळी येथे भावकीतील जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, महिला बेशुद्ध

Chakan: Husband and wife beaten over land dispute in Kuruli, woman unconscious

एमपीसी न्यूज – जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटांमध्ये वाद झाला. यात तीन जणांनी मिळून पती पत्नीस मारहाण केली. भांडणात एक महिला बेशुद्ध झाली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी कुरूळीमधील गायकवाड वस्ती येथे घडली.

शोभा पांडुरंग गायकवाड (वय 38, रा. कुरळी, गायकवाड वस्ती, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती बाबुराव गायकवाड, मनीषा मारुती गायकवाड, सूचित मारुती गायकवाड (सर्व रा. कुरळी, गायकवाड वस्ती, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहे. सोमवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी मारुती याने फिर्यादी यांचे पती पांडुरंग गायकवाड यांना मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता आरोपी मनीषा या महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपी सूचित याने फिर्यादी यांना लाकडी दांड्याने मारून बेशुद्ध केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like