illegal Plotting : वाकी खुर्द मध्ये बेकायदा प्लॉटिंगला चाप

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांची फसवून आणि कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायात अनेक राजकीय वरदहस्त असलेली मंडळी शिरली आहेत.(illegal Plotting) त्यामुळे चाकण जवळील वाकी खुर्द ( ता.खेड ) ग्रामपंचायतीने ठराव करून अशा बेकायदा प्लॉटिंगला चाप लावला आहे.

चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत  जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वाकी खु. ग्रामपंचायतीच्या कारभार्यांनी या प्रकारांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे.(illegal Plotting) भूमाफियांसह दलालांनी सर्वत्र गुपचूप शेतजमिनीचे बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे. चाकण भागातील प्लॉटिंग दलालांनी महसूल प्रशासनातीलच अनेकांना हाताशी धरून डोंगर,टेकड्या, ओढ्यांमधील जमिनींचे आणि वादादित व इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे.

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल

गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून चौपट पाचपट दराने असे भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केले जात आहेत. महसूल विभागातील मंडळीं देखील लालसेतून कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत.  त्यामुळे वाकी खु. ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी फ्लेक्स लावून अशा बेकायदा प्लॉटिंग मध्ये गुंठा- अर्धा गुंठा जमिनी खरेदी करू नयेत असे आवाहन केले आहे.

पीएमआरडीए कडून नकाशा मंजुर करून आणि सर्व सुविधा देऊनच ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटिंग करावे , अन्यथा या बाबत पीएमआरडीएला कळवण्यात येईल असा स्पष्ट इशारा बेकायदा प्लॉटिंग (illegal Plotting) करणाऱ्या मंडळीना दिला असल्याचे सरपंच अनुताई काळे, उपसरपंच प्रीती गायकवाड, माजी उपसरपंच संदीप जाधव, संतोष वहिले, सदस्य अमोल जाधव,  मयूर परदेशी, मंगल जाधव आदींसह सर्व सदस्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.