BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : खराबवाडीतील खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; सहा जण ताब्यात

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – खराबवाडी (ता. खेड) येथील प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले बहुतांश हल्लेखोर खराबवाडी (ता. खेड) येथील आहेत.

प्रशांत धर्मनाथ बिरदवडे ( वय १९ रा. राणूबाईमळा, चाकण) असे या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव असून पियुष शंकर धाडगे ( वय १९, रा राणूबाईमळा, चाकण) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पियुष शंकर धाडगे याने फिर्याद दिली आहे.

  • पियुष याच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी आकाश राजाभाऊ शिंदे, पांग्या लांडगे, बफन लांडगे, प्रथमेश जाधव, अक्षय लोमटे, बाब्या राजगुरु (सर्व रा. जंबूकरवस्ती, खराबवाडी, ता. खेड जि. पुणे) लंगडा पुरी (पुर्ण नाव निष्पन्ननाही) हर्षल खराबी (रा. खालुंब्रे, ता. खेड जि. पुणे) या आठ जणांवर भा.दं.वि. कलम ३०२,३०७,१२०(ब), आर्मएॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, खराबवाडी (ता.खेड) येथे शुक्रवारी रात्री झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा सहाजणांना ताब्यात घेतले असून त्यातील तीनजण सोळा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन आहेत. हे सर्वजण घटनेनंतर जुन्नर तालुक्यातील कुभारवाडा येथे नातेवाईकांकडे लपण्यासाठी गेले होते. जुन्नर तालुक्यातील कुंभारवाडा भागात नातेवाईकांकडे यातील काहीजण लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने सहाजणांना जुन्नर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. आकाश राजाभाऊ शिंदे (वय १९), अक्षय लोमटे (वय १९), सचिन अशोक पुरी (वय २१) आणि अन्य तिघे अल्पवयीन अशा सहाजणांना जुन्नर तालुक्यातून ताब्यात घेतल्याची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

  • जखमी पियुष धाडगे याने चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मित्र प्रशांत बिरदवडे आणि फिर्यादी पियुष असे दोघेजण शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास खराबवाडी गावचे हद्दीतील कुशल स्वर्णाली सोसायटी समोरून दुचाकीवरून चाकण तळेगाव रस्त्याने जात होते. त्यावेळी वरील सर्व जण संगनमताने दोन दुचाकीवरून पाठलाग करीत आले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी आणि प्रशांत यांना रस्त्यात अडविले. पुर्वी समर्थ कॉलेजचे गॅदरींगमध्ये आकाश शिंदे (रा. जंबुकर वस्ती, खराबवाडी) यांचे बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सर्वांनी संगनमताने लोखंडी कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने फिर्यादी पियुष आणि प्रशांत बिरदवडे या दोघांवर सपासप कोयत्याने वार केले. प्रशांत याच्या डोक्यात आणि शरीरावर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जागीच कोसळला. पियुष याने पळ काढल्याने तो बचावला.
HB_POST_END_FTR-A4

.