Chakan: ऑटोमोटीव्ह निर्मिती क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर – देवेंद्र फडणवीस

हारमनच्या चाकण येथील ऑटोमोटीव्ह आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीच्या दुस-या प्लान्टचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यामध्ये निर्मिती वाढविण्यासाठी हारमनच्या नवीन गुंतवणूकीचे स्वागत करतो. मागील पाच वर्षांपासून सरकार सातत्याने व्यवसायांची वाढ आणि विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. भारतामध्ये कौशल्यपूर्ण कर्मचा-यांना प्रोत्साहन देत. या उपक्रमाचा फायदा घेऊन हारमनसारख्या जागतिक कॉर्पोरेशनने यामध्ये वाढ करण्यास सहभाग घेतल्याने आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच पुण्याला ‘पुण्याचे डेट्रॉइट ऑफ दी इट’ संबोधतात. ऑटोमोटिव्ह निर्मीतीच्या जागतिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून ऑटोमोटीव्ह निर्मिती क्षेत्रात पुणे देशात अग्रेसर आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र-भारत सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची सहाय्यक मालकीची कंपनी हारमनने महाराष्ट्रामधील चाकण येथे ऑटोमोटिव्ह निर्मीती प्रकल्पाचा विस्तार केला आहे. हा प्रकल्प मेक इन इंडियाचा राष्ट्रीय प्राधान्य असलेला उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या फेज दोनचे आज (सोमवारी) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  • नीती (एनआयटीआय) आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हारमनचे अध्यक्ष दिनेश सी पालिवाल, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पिंपरी महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ”महाराष्ट्र हे भारताचे ऑटोमोटीव्ह हब आहे. मोबाईलच्या सर्व कंपन्या महाराष्ट्रात आहेत. वाहनांचे विविध भाग महाराष्ट्रात बनतात. इको सिस्टीमला त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करण्यास प्रेरणा मिळेल. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने उद्योगाला लागणा-या परवानग्या सुलभ केल्या आहेत. सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था चांगली आहे. कुशल मनुष्यबळ उलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या कंपन्या महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करत आहेत”.

  • ”केंद्रातील मोदी सरकार उद्योग वाढविण्यासाठी नवीन धोरण आणत आहे. जुन्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे व्यावसाय करणे सोपे आणि सुलभ होणार आहे. रोजगार, नोक-या उपलब्ध करण्यास सरकारचे प्राधान्य आहे. तरुण टेक्नोसेव्ही (तंत्रस्नेही) आहेत. ही चांगली बाब आहे. भारतातील व्यापारावर निर्बंध लादलेले असतानाही भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारतातील बाजरपेठ चांगली असून ही बाजारपेठ वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यास मोठी संधी आहे”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

त्यानंतर अमिताभ कांत म्हणाले, ”भारताच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य आमच्या मोठ्या सहकार्याचा प्रकार आणि शक्ती यांवर अवलंबून आहे. हारमनने केलेल्या या पहिल्याच मोठ्या गुंतवणूकीला प्रोत्साहन देतो. ज्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तत्काळ करण्यात आली. पंतप्रधान शासनाअंतर्गत भारत प्रायव्हेट विभागातील गुंतवणूक आणि नोकरीची संधी ज्यातून मिळेल, अशा विभागामध्ये हस्तक्षेप करुन मोठा विकास करत आहे. हारमनने केलेली गुंतवणूक योग्य दिशेत पाऊल उचलत आहे”.

हारमनचे अध्यक्ष दिनेश पालिवाल म्हणाले, ”हारमन ही विश्वस्तरीय जोडलेल्या कार उद्योगासाठी महत्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची सप्लायर म्हणून अग्रेसर आहे. भारतामधील व्यवसाय धोरणांमध्ये जलद होणारी सुधारणा आणि व्यवसाय करण्याची सुविधा यामुळे गुंतवणूक करण्यास मदत झाली. हा महत्वपूर्ण निर्मीती विस्तार वाढीच्या योजनांना आणि मेक इन इंडिया स्वप्नाला आधार देणारा आहे. हा महत्वपूर्ण टप्पा आहे. बेंगलोर, पुणे, दिल्ली याठिकाणी आधीपासूनच आमच्या आर अँड डी सेंटरमध्ये 9000 पेक्षा जास्त विश्वस्तरीय अभियंता आणि वैज्ञानिक आहेत. जे जागतिक विकासामध्ये सहभागी आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like