Chakan : ओबीसीमध्ये कुलवंत वाणी समाजाचा समावेश; प्रशासकीय आदेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातल्या कुलवंत वाणी या समाजाचा प्रलंबित ओबीसी विषयीचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.  4 जून 2019 रोजी  याबाबत प्रशासकीय आदेश (जीआर) निघाल्याने ओबीसी आरक्षणापासून वंचित असलेल्या कुलवंत वाणी समाजाला न्याय मिळाला आहे. यासाठी खेडच्या लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. 

सन 2010 मध्ये एका याचिकेवरील निकालामुळे कुलवंत वाणी समाजाला मिळत असलेल्या ओबीसी सवलती या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सातत्याने या समाजाने प्रयत्न करून राज्य मागासवर्ग आयोगाकडून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वेक्षण करून याबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल ऑक्टोबर 2014 मध्ये राज्य शासनाकडे सादर केला.

  • सन 2014 पासून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन निर्णय होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु या समाजाकडे कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळे अडचणी येत होत्या. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी या समाजाचे प्रतिनिधींसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातत्याने पाठपुरावा केला.

याबाबत हिवाळी अधिवेशन 2017 मध्ये लक्षवेधी मांडली. त्यानंतर  हिवाळी अधिवेशन 2018 मध्ये सभागृहात यावर अर्धातास चर्चाही घडवून आणली. या पाठपुराव्यामुळे 1 मार्च 2019 मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन कुलवंत वाणी समाजाला ओबीसी सवलती परत पूर्ववत प्रदान करण्यात याव्यात असा निर्णय घेतला. याच अनुषंगाने 4 जून 2019 रोजी याबाबत प्रशासकीय आदेश (जीआर) देखील निघाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ओबीसी आरक्षणापासून वंचित असलेल्या कुलवंत वाणी समाजाला न्याय मिळाला. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील कुलवंत वाणी समाजबांधवांच्या प्रतिनिधींनी चाकण येथे येऊन शनिवारी (दि.८) खेडचेआमदार सुरेश गोरे यांचा सत्कार केला.

  • याप्रसंगी ओबीसी कृती समितीचे निमंत्रक प्रकाश सिद्ध, बाळासाहेब (नाना) भोरे,  हेमंत धावडे, दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठानचे संस्थापक मामासाहेब शिंदे,  राजेंद्र शिंदे  प्रशांत गोलांडे, प्रशांत  सिध्द, समीर खडके , अजित तोडकर, राजाभाऊ आरडे, संजय  बारसकर, दिपक भगवे, सुनिल  दंडे, प्रकाश गोलांडे, रोहित तोडकर, अमित औटी, सचिन  खोले, किरण शेटे, गणेश शेटे, दत्तात्रय  कळसकर,राकेश  गोडसे, चाकण,खेड, आळंदी  येथील समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.