Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामुळे शहरातील वाहनमालक भीतीच्या वातावरणात आहेत.

अनिल कचरू पवार (वय 30, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी महाळुंगे येथील व्ही डब्ल्यू कंपनी समोर असलेल्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

जयराम शिवलाल साहू (वय 47, रा. च-होली खुर्द) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयराम यांचा कामगार धर्मेंद्र सुदामा यादव (वय 29, रा. येळवंडेवस्ती, खालुम्ब्रे) याने त्याची 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल एम एच 14 / बी डी 1064 तो राहत असलेल्या इमारती समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्याची दुचाकी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

डायाराम चेनारामजी चौधरी (वय 53, रा. घाडगेवस्ती चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी रविवारी (दि. 22) रात्री अकरा वाजता गत्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी एम एच 14 / जी एफ 7462 त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.