Chakan : कांद्याच्या आवकेत वाढ; दरात घसरण हिरवी मिरची, वाटाणा व गाजराचे भाव तेजीत

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan) चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये हिरवी मिरची, वाटाणा व गाजराचे भाव तेजीत राहिले आहेत. बटाट्याची आवक घटून भाव स्थिर राहिले. कांदा, लसूण व वाटाण्याची उच्चांकी आवक होऊन भावात घसरण झाली. फळभाज्यांच्या बाजारात गाजर, वाटाणा व हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत घट झाली. तर म्हशीच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 7 कोटी, 30 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 20 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2,250 क्विंटलने वाढल्याने भावात 400 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 2,200 रुपयांवरून 1800 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1000 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1750 क्विंटलने घटून बटाट्याचा कमाल भाव 2000 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमुग शेंगा व बंदूक भूईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 33 क्विंटल झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने वाढल्याने भावात 3 हजार रुपयांची घट झाली. लसणाचा कमाल भाव 20 हजार रुपयांवरून 17 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 390 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 40 क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला 4 हजार रुपयांपासून ते 5 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Chakan: संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ ? खा. अमोल कोल्हे यांचा सवाल

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा – एकूण आवक – 20,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,300 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,700 रुपये, भाव क्रमांक 3. 1,500 रुपये.

फळभाज्या – Chakan

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 312 क्विंटल (1000 ते 1500 रू. ), कोबी – 190 क्विंटल ( 800 ते 1200 रू.), फ्लॉवर – 208 क्विंटल ( 700 ते 1000 रु.), वांगी – 87 क्विंटल (1000 ते 2000 रु.), भेंडी – 95 क्विंटल (2000 ते 3000 रु.), दोडका – 62 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), कारली – 74 क्विंटल ( 2500 ते 3500 रु.), दुधीभोपळा – 60 क्विंटल (1000 ते 2000 रु.), काकडी – 72 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), फरशी –  57 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), वालवड -46 क्विंटल (3000 ते 6000 रुपये), गवार – 26 क्विंटल ( 4000 ते 6000 रुपये, ), ढोबळी मिरची – 190 क्विंटल (3000 ते 4500 रु.), चवळी – 32 क्विंटल (4500 ते 6000 रु.), वाटाणा – 240 क्विंटल (4500 ते 6000 रु.), शेवगा – 37 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), गाजर – 255 क्विंटल ( 1000 ते 1500 रु.),.

पालेभाज्या –

चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – Chakan

मेथी – एकूण 10 हजार 500 जुड्या (800 ते 1200 रुपये,), कोथिंबीर – एकूण 23 हजार 950 जुड्या ( 600 ते 1000 रुपये,), शेपू – एकूण 4 हजार 200 जुड्या (500 ते 900 रुपये ), पालक – एकूण 4 हजार 600 जुड्या (400 ते 600 रुपये),.

जनावरे –

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 47 जर्शी गाईपैकी 38 गाईची विक्री झाली. (15000 ते 70000 रु.), 120 बैलांपैकी 80 बैलांची विक्री झाली. (10000 ते 40000 रु.), 160 म्हशीपैकी 140 म्हशींची विक्री झाली.(30000 ते 80000 रु.), 10 हजार 200 शेळ्या – मेंढ्यापैकी 10000 शेळ्यांची विक्री झाली. (2000 ते 25000 रु.),.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.