Chakan : भाड्याने घेतलेल्या 36 लाखांच्या सेंट्रींग मटेरियलची परस्पर विल्हेवाट

एमपीसी न्यूज – एका कंपनीकडून सुमारे 35 लाख 96 हजार रुपयांचे सेंट्रींग मटेरियल भाड्याने घेतले. ते मटेरियल परत न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 ऑक्‍टोबर ते 28 डिसेंबर 2018 या कालावधीत चाकण येथे घडली.

मयंक सुभाष अग्रवाल (वय 25, रा. सुस, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीकांत वामन चितारे (रा. मांजरी ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक यांचा सेंट्रींग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्यांचे नाणेकरवाडी येथे गोडाऊन आहे. श्रीकांत याने मयंक यांच्या कंपनीकडून सुमारे 35 लाख 96 हजार रुपयांचे सेंट्रींग मटेरियल भाड्याने घेतले.

भाड्याने घेतलेल्या मटेरियलचे भाडे न देता मटेरियलची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत मयंक यांनी चाकण पोलिसात गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.