Chakan : चाकूचा धाक दाखवून टपरीतील रोकड पळवली; एकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत टपरीतून 14 हजार रुपयांची रोकड पळवली. हा प्रकार शनिवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रोड कुरुळी येथे हिरा हॉटेल जवळ घडली.

हेतराम गुरु सिंग (वय 55, रा. कुरूळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हुसेन फैजल अहमद (वय 22, रा. गवते वस्ती, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांची आळंदी रोडवर कुरळी येथे हीरा हॉटेल जवळ पानाची टपरी आहे. शनिवारी रात्री ते टपरीवर असताना आरोपी तेथे आला. आरोपीने चाकूचा धाक दाखवून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली. त्यात फिर्यादी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने टपरीतील गल्ल्यात ठेवलेले 14 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.