BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या टेम्पोच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर आळंदी फाटा येथे शनिवारी (दि. 9) झाला.

गीता सुखराम मौर्य (वय 30, रा. कुरुळी चाकण. मूळ रा. सोना ठाण, जि. बस्ती, उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. टेम्पो चालक ज्ञानेश्वर लक्ष्मण बो-हाडे (वय 34, रा. बांदल वस्ती, मोशी रोड, चिंबळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार आनंत सीताराम डोंगरे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मयत गीता पुणे-नाशिक महामार्गावर आळंदी फाटा येथे असलेल्या माय कार शोरूम समोरील रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर 909 टेम्पो (एम एच 04 / एफ जे 7807) भरधाव वेगात चालवत आला. त्याने गीता यांना धडक दिली. या धडकेत गीता गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कठोरे तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.