Chakan : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून अडतीस हजारांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – वाकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पत्रेवस्ती या शाळेतून बॅटरी, लॅपटॉप, जनरेटर, प्रिंटर असा एकूण 38 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) सकाळी पावणे सातच्या सुमारास उघडकीस आली.

विजय पांडुरंग दिवेकर (वय 43, रा. राजगुरुनगर, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकी बुद्रुक येथील पत्रेवस्तीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शुक्रवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता शाळा बंद करण्यात आली. रात्री अज्ञात चोरट्याने शाळेच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. संगणक कक्षातून एक्साइड कंपनीची बॅटरी, एस्सार कंपनीचा लॅपटॉप, मायक्रोटेक कंपनीचे जनरेटर, कॅनन कंपनीचा प्रिंटर असा एकूण 38 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास शाळा उघडण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.