Chakan : सीताफळाच्या बागेत शौचास बसण्यास अडविल्यावरून बागेच्या मालकावर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – घराजवळ असलेल्या सीताफळाच्या बागेत एकजण शौचास बसत होता. त्यामुळे ‘ही शौचास बसण्याची जागा नाही’ असे म्हणत त्याला शौचास बसण्यास अडविल्यावरून दोघांनी बागेच्या मालकावर सत्तूरने वार करत जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री सव्वानऊ वाजता शेलपिंपळगाव, चाकण येथे घडली.

नितीन रामदास कराळे (वय 21), संदीप दिनकर सोनवणे (वय 30, रा. शेलपिंपळगाव, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश हनुमंत शितोळे (वय 45, रा. शेलपिंपळगाव, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितोळे यांची शेलपिंपळ्गाव येथे त्यांच्या घरासमोर सीताफळाची बाग आहे. शुक्रवारी रात्री एकजण त्यांच्या सीताफळाच्या बागेत शौचास बसलेला दिसले. त्यामुळे शितोळे यांनी त्या इसमाला ‘इथे शौचास बसू नको, ही शौचास बसण्याची जागा नाही’ असे म्हटले. या कारणावरून आरोपी नितीन याने शिवीगाळ करून ‘तू मला ओळखत नाही. मी तुला खल्लासच करतो’ असे म्हणत शितोळे यांच्यावर सत्तूरने पाठीवर, दंडावर, मानेवर वार केले.

शितोळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने त्यांचा भाडेकरू रामू अनुवादी प्रतापती हा तिथे आला. आरोपी संदीप याने त्यांच्यावर देखील सत्तूरने वार केले. मात्र, रामू यांनी वार चुकवून तिथून पळ काढला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like