Chakan : चाकणच्या विकासाकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची गरज – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – चाकण हे मोठे (Chakan) औद्योगीक क्षेत्र असून ते झपाट्याने वाढत आहे. चाकणचा विकास हा योग्य पद्धतीने होणे अपेक्षीत असेल तरी चाकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यासाठी अगदी सरपंच ते खासदारापर्यंत सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर जसे औद्योगिक शहर म्हणून वाढले, तसे चाकण शहर देखील वाढणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार सत्तेतील तसेच विरोधी नेते, प्रशासकीय अधिकारी यांनी करणे गरजेचे आहे.

Maharashtra : आरक्षित शासकीय पदावर महिला उमेदवारांची लवकरच लागणार वर्णी

मागील दहा -पंधरा वर्षात चाकण भागात हवा तसा काहीही विकास झाला नाही. ह्याचे मूळ कारण इथे शासनामार्फत विकासाचे कोणतेही काम झाले नाही.

  1. तळेगाव- चाकण रस्ता, नाशिक फाटा ते खेड रस्ता रुंदीकरण, चाकण चौक व अंबेठाण चौकतील उड्डाण पूल अनेक वेळा कागदावरच तयार होतात पण जमिनीवर नाही.
  2. चाकण, खेड भागातील दूरदृष्टी नसलेल्या राजकारणी व्यक्तींनी इथला आंतरराष्ट्रीय विमानतळ घालवला.
  3. पीएमआरडीएने पुण्यातील इतर भागात विकास कामासाठी खूप खर्च केला, पण चाकण भागातून फक्त महसूल गोळा केला. एकही डी पी रोड  किंवा टी पी स्कीम राबवली नाही. खडकवासलापर्यंत मेट्रो नेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण चाकण मेट्रो नाही म्हणजे नाहीच.
  4. चाकण भागात एकदा काम केलेले बिल्डर परत ह्या भागात काम करत नाही, नवीन उद्योजक एकदा चाकण चौकात अडकला तर तो परत इथे येतच नाही. एमआयडीसी टप्पा पाचचा विकास अतिशय मंद गतीने होत आहे. एमआयडीसीचे टप्पा सहा, सात अशे कोणतेही नियोजन नाही.
  5. चाकण भागात पाण्याची खूपच वाईट अवस्था आहे.
  6. पिंपरी चिंचवड सारखा जलद गतीने  विकास चाकण भागात होण्यासाठी इथे महानगरपालिका होणे ही काळाची गरज आहे.

या सर्व विषयासाठी आवज उठवण्याची जबाबदारी (Chakan) ही स्थनिक जनप्रतिनिधी ची आहे. जनप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्यांनी वरील विषयासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सर्व पक्षातील सर्व जनप्रतिनिधीनी एकत्रितपणे व वैयक्तिक स्थळावर चाकण खेड भागाच्या विकासासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती ही राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.