Chakan : महिंद्रा कंपनी 31 मार्च पर्यंत ‘शटडाऊन’

एमपीसी न्यूज – आज पहाटे पासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले असून त्यानुसार जमावबंदीला मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आज (सोमवार) पासून 31 मार्चपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

महिंद्रा कंपनीच्या चाकणचे प्लॅंट हेड नचिकेत कोडकणी यांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून कंपनी एक एप्रिल पासून नियमित सुरु राहील. कंपनीच्या कर्मचारी व ट्रेनी यांनी आहे तिथेच राहून नियमांचे पालन करावे व कोरोना पासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन कोडकणी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.