Chakan News : कंपनीतून शोरूमसाठी निघालेली बोलेरो चालकानेच पळवली

एमपीसी न्यूज चाकण येथील महिंद्रा अँड कंपनीची सुमारे 7 लाख रुपयांची बोलेरो पिक अप चारचाकी चालकाने गुजरात येथील शोरूममध्ये न पोहचवता ती परस्पर चोरून नेली आहे.(Chakan News) यावरून चाकण पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्ह दाखल झाला असून हा प्रकार 22 नोव्हेंबर रोजी घडला आहे.

कलीम शेख सलीम पिंजारी (वय 38 रा. निघोज) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बाबुलाल विश्वनाथ नवघरे (रा.अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Moshi News : ओळखीच्या व्यक्तीच्या नावाचा मॅसेज करत ज्येष्ठ महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील निघोजे येथील महिन्द्रा अँड कंपनीकडून 7 लाख रुपयांची बोलेरो MAXX  Pick up City 3000  ही गाडी 18 नोव्हेंबर रोजी तयार झालेली नवीकोरी गाडी गुजरात येथील भूजमधील शोरूमसाठी पाठवायचो होती. (Chakan News) ती 22 नोव्हेंबर रोजी चाकण येथून निघाली, 25 नोव्हेंबर रोजी गुजरातला पोहचणे अपेक्षीत होते मात्र अद्यापही गाडी शोरूमला गेली नसल्याने गाडीचा अपहार झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने चाकण पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.