Chakan: चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

Chakan: Marital harassment due to suspicion on character विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना हाताने, लोखंडी रॉडने मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला.

एमपीसी न्यूज- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला माहेरहून 11 एकर शेती वाटून घेण्यासाठी तगादा लावला. ही घटना 30 जून 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत खराबवाडी येथे घडली.

सचिन गुलाबराव चव्हाण, लताबाई गुलाबराव चव्हाण, गुलाबराव रामसिंग चव्हाण, राहुल गुलाबराव चव्हाण, कोमल राहुल चव्हाण (सर्व रा. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला त्रास दिला. ‘तुला तुझ्या लग्नात माहेरच्या लोकांनी काहीही दिलेले नाही. तू तुझ्या वडिलांची 22 एकर शेतामधील 11 एकर शेती वाटून घे व आम्हाला दे’ अशी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे मागणी केली.

त्यावरून हाताने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना हाताने, लोखंडी रॉडने मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.