Chakan Market : कांद्याच्या भावात वाढ; हिरवी मिरची, वाटाणा व लसणाचे भाव तेजीत

एमपीसी न्यूज : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan Market) चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ झाली. हिरवी मिरची, वाटाणा व लसणाचे भाव तेजीत आहेत. पालेभाज्यांची मोठी आवक झाली. बटाट्याची आवक स्थिर राहिल्याने भावात वाढ झाली. साता-याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून डांगर भोपळा, तोतापुरी कलमी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जळगाव भुईमुग शेंगा व बंदुक भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाईच्या संख्येत घट झाली. तर बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्याच्या संख्येत भरपूर वाढ झाली. एकूण उलाढाल 4 कोटी, 10 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 3450 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 2550 क्विंटलने घटल्याने भावात 200 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 900 रुपयांवरून 1100 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1000 क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिल्याने भावात 200 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपयांवरून 2000 रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगां व बंदूक भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 80 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 55 क्विंटलने वाढून भावात 2000 रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 6 हजार रुपयांवरून 8 हजार रुपयांवर पोहोचला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 325 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही (Chakan Market) आवक 100 क्विंटलने घटल्याने भावात वाढ झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Pune : विविध सामाजिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ,धर्मप्रेमी यांचा हिंदू एकता दिंडीत उत्स्फूर्त सहभाग


शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –

कांदा – एकूण आवक – 3450 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1100 रुपये, भाव क्रमांक 2. 800 रुपये, भाव क्रमांक 3. 600 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,700 रुपये, भाव क्रमांक 3. 1300 रुपये.


फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –

टोमॅटो – 312 क्विंटल ( 800 ते 1000 रू. ), कोबी – 190 क्विंटल ( 500 ते 800 रू.), फ्लॉवर – 197 क्विंटल ( 600 ते 900 रु.), वांगी – 83 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), भेंडी – 135 क्विंटल ( 2000 ते 4000 रु.), दोडका – 63 क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), कारली – 69 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1000 ते 2000 रु.), काकडी – 74 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), फरशी – 69 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), वालवड – 63 क्विंटल (1500 ते 2500 रुपये), गवार – 14 क्विंटल ( 7000 ते 9000 रू.), ढोबळी मिरची – 136 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), चवळी – 24 क्विंटल ( 2000 ते 3000 रुपये), वाटाणा – 55 क्विंटल (5000 ते 7000 रु.), शेवगा – 30 क्विंटल ( 2000 ते 3000 रुपये ), गाजर – 105 क्विंटल ( 1500 ते 2000 रु.).


चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – Chakan Market

मेथी – एकूण 26 हजार 500 जुड्या ( 800 ते 1200 रुपये,), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या ( 500 ते 1500 रुपये,), शेपू – एकूण 3 हजार, 550 जुड्या (800 ते 1200 रुपये ), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या ( 400 ते 600 रुपये),.


जनावरे –

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 42 जर्शी गाईपैकी 22 गाईची विक्री झाली. ( 15000 ते 65000 रुपये), 110 बैलांपैकी 95 बैलांची विक्री झाली, (15000 ते 50000 रुपये), 140 म्हैशीपैकी 115 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, विक्रीसाठी आलेल्या 10750 शेळ्यापैकी 10280 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.