Chakan Market : चाकणला कांद्याची मोठी आवक; कांद्याला 1,300 ते 2 हजारांचा भाव

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये (Chakan Market) कांद्याची आवक 9 हजार 000 रुपये पिशवी म्हणजेच 4 हजार 750 क्विंटल इतकी झाली. अचानक मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही कांद्याचे भाव स्थिर राहिले. कांद्याला प्रतीक्विंटलला 1,300 ते 2 हजार रुपये एवढा भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चाकणमध्ये (Chakan Market) बटाट्याची 3 हजार 300 पिशवी म्हणजे 1 हजार 650 क्विंटल आवक होऊन बटाट्याला 1,300 ते 1,700 रुपये दर मिळाला. नवीन गावरान बटाट्याला 1,300 ते 1,500 रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या हंगामातील सर्वात मोठी कांद्याची आवक बुधवारी (दि. 11) झाली. पुढील काळात कांद्याचा हंगाम सुरु होणार आहे. सध्या बाजारात पंचगंगा व लाल कांदा याची आवक होत आहे.

Pune News: पुण्यात रास्ता पेठेत दोघांकडून साडेसहा लाख रुपयांचा गांजा जप्त

पुढील काळात निर्यातक्षम कांद्याची आवक होणार असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. चाकण मार्केटमध्ये (Chakan Market) आवक होत असलेला कांदा देशातील अन्य राज्यात पाठवण्यात येत आहे.

दरम्यान कांद्याला आणखी दर मिळावा, अशी अपेक्षा मार्केटमध्ये कांदा घेऊन येणारे शेतकरी व्यक्त करत आहेत. पुढील काळात कांद्याची मोठी आवक होऊन दर गडगडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.