chakan : मार्केट यार्ड बेमुदत काळासाठी बंद; आडते असोसिएशनचा निर्णय

एमपीसी न्यूज ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकण मार्केट यार्ड बुधवार दि. ८ एप्रिलपासून बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात चाकण आणि परिसरातील नागरिकांना भाजीपाला मिळणे अवघड होणार आहे.

चाकण बाजारात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अन्य भागातील नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा बाजार बंद झाल्याने नागरिकांनी गैरसोय होत असतानाही समाधान व्यक्त केले जात आहे. मागील काही दिवसांपासून येथील मार्केटमध्ये पहाटे प्रचंड गर्दी होत होती. त्यामुळे सर्वच स्तरातून चिंता व्यक्त होत होती.

या बाबत चाकण मार्केट यार्डातील तरकारी मालाच्या आडते असोसिएशनचे अध्यक्ष कुमार गोरे म्हणाले, कोरोनाचा धोका असेपर्यंत हे मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय अडत्यांनी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.