Chakan : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या वेगवेगळ्या मागण्यांना तसेच शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना खेड तालुक्यातील काळुस घोटवडे वस्ती येथे घडली.

वैशाली नितीन पोटवडे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन संभाजी पोटवडे (वय 30), मंदाबाई संभाजी पोटवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी आरोपी नितीन याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयत वैशाली यांना जमीन खरेदी करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी केली. वैशाली यांनी माहेरहून त्यासाठी एक लाख रुपये आणून सासरच्यांना दिले. वैशाली यांच्या वाट्याला माहेरची एक एकर जमीन आली. ती जमीन आरोपी नितीन याने स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी वैशाली यांच्याकडे तगादा लावला. तसेच त्यांना शिवीगाळ व मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या जाचाला कंटाळून वैशाली यांनी घराजवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.