Chakan Vehicle theft: चाकण एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईतास बेड्या

एमपीसी न्यूज : एम.आय.डी.सी. परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईतास म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Chakan Vehicle theft) ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.11) केली. त्याच्याकडून पोलिसांनी अत्तापर्यंत चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. महेश भगवान गिरी (वय 22 रा. खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी चाकण परिसरात सतत होणाऱ्या दुचाकी चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयीताला पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने चौरी करत असल्याचे कबुल केले. त्याकडे असलेल्या  1 लाख 17 हजार रुपयांच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून त्याच्यावर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तीन तर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.याचा पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत आहे.

Student Felicitation: नाना काटे सोशल फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावेळी पोलिसांनी एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कामगारांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांची वहाने ही व्यवस्थीत लॉक करून सीसीटीव्हीच्या निगराणीच्या क्षेत्रात पार्क करावीत.(Chakan Vehicle theft)  दुचाकी चालकांनी गाडीचे हँडल लॉक व्यवस्थीत लॉक करावे तसेच दुचाकीच्या टायरलाही लॉक करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.