Chakan : कोयत्याचा धाक दाखवून पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पादचारी तरुणाचा मोबाईल चोरून नेला. ही घटना नाणेकरवाडी यूसीजी कंपनीसमोर घडली.

प्रवीण सुरेश आंबुलकर (वय 29, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि 19) रात्री पावणेबाराच्या सुमारास प्रवीण नाणेकरवाडी येथील युसीजी कंपनी समोरून पायी चालत जात होते. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी प्रवीण यांना कोयत्याचा धाक दाखवला. प्रवीण यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.