Mobile Theft: चाकण येथे मोबाईल चोरास पादचाऱ्याने पाठलाग करून पकडले

एमपीसी न्यूज: चाकण गावात काल रात्री मोबाईल चोरणाऱ्यास पीडीत पादचाऱ्याने पाठलाग करून पकडले आहे.अक्षय चौहान, वय 24 वर्षे, रा. मेदनकरवाडी, तालुका खेड या आरोपीस अटक करण्यात आले आहे. (Mobile Theft) त्याच्या विरोधात भा. द. वि कलम 392 अन्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Chikhli Crime: भांडणाच्या रागातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक

 

याबाबत भुवेश महाले, वय 23 वर्षे, रा. शिवणी तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यांनी फिर्यादी दिली आहे. काल 3 ऑगस्टला रात्री 8 वा च्या सुमारास मौजे चाकण गावचे हद्दीत मुटकेवाडी येथील नांजरे क्रेनचे ऑफिस समोर चाकण बाजूकडून पुणे बाजूकडे चालत जात होते. त्यावेळेस आरोपी फिर्यादी यांचा 13,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन पळूण गेला. त्याचा पाठलाग करून पकडून फिर्यादीने आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.