_MPC_DIR_MPU_III

Chakan : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

शिक्षक, मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनींसोबत एका शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब एका स्वयंसेवी संस्थेने शाळेतील मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता उघडकीस आली. हा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी येथे घडला. याप्रकरणी शिक्षक, मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

रासे केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास चंदर सोनवणे (वय 52) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्राथमिक शिक्षक बालाजी लिंबाजी डोंबे, मुख्याध्यापक नितीन जाधव व दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबे हा मेदनकरवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहे. त्याने सातवीमध्ये शिकणा-या काही विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. मात्र भीतीपोटी मुलींनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. महिला स्वयंसेवी संस्थांनी याबाबत मुलींना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता पीडित विद्यार्थिनींनी याबाबत खुलासा केला. या संस्थांनी शाळेतील वरिष्ठांशी याबाबत तक्रार केली. मात्र याची शाळा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर संस्थांनी वरिष्ठ प्रशासनाला याबाबत माहिती दिली असता केंद्रप्रमुख सोनावणे यांनी संबंधितां विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. 4) रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. आरोपींवर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित शाळेतील मुलींच्या पालकांमधून या प्रकरणाचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलींनी शाळेत जायचे का? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.