Chakan : फिल्ड ऑफिसरकडून महिला गार्डचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एका खासगी कंपनीतील फिल्ड ऑफिसरने कंपनीत काम करणा-या महिला गार्डचा विनयभंग केला. महिलेने कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, कंपनी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने महिलेने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. ही घटना कुरुळी फाटा ते तळेगाव चौक चाकण येथे घडली.

दीपक गायकवाड (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या फिल्ड ऑफिसरचे नाव आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली पीडित महिला चाकण येथील एका खासगी कंपनीत गार्ड म्हणून काम करत होती. त्याच कंपनीत दीपक फिल्ड ऑफिसर म्हणून काम करत होता. एके दिवशी कामावरून घरी जात असताना दीपक याने पीडित महिलेशी अश्लील संवाद साधत तिचा विनयभंग केला.

याबाबत महिलेने कंपनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, कंपनीने महिलेला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, महिलेने त्या कंपनीतील काम सोडले. कंपनीने दीपक याच्यावर काहीही कारवाई न केल्याने पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. पोलीस हवालदार संजय घाडगे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.