Chakan : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी बालाजीनगर मदनकरवाडी येथे घडली.

दीपक दशरथ मंजुळे (रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी दीपक यांचे पैशांच्या व्यवहारातून वाद सुरु होते. पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपी दीपक शनिवारी सकाळी महिलेच्या घरात घुसला. त्याने फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.