Chakan : बनावट फेसबुक अकाउंटवरून महिलेची बदनामी करणा-यावर गुन्हा
एमपीसी न्यूज – बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर महिलेचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2018 ते 4 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडला.
सुनील बाम्बू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील याने एक बनावट फेसबुक अकाउंट उघडले. त्या अकाउंटवर प्रोफाइल फोटो म्हणून पीडित महिलेचा फोटो लावला. अकाउंटचा कव्हर फोटो म्हणून पीडित महिलेचा अर्धनग्न फोटो ठेवला. तसेच पीडित महिलेचे अश्लील फोटो सुनील याने फेसबुकवर अपलोड करून महिलेची बदनामी केली असल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत महिलेने पोलीस धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी सुनील याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67, (अ), 67, 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.