Chakan : संशयाच्या कारणावरून झालेल्या वादातून पत्नीचा खून

Chakan: Murder of wife due to dispute over suspicion आरोपीने स्वत:च्या पत्नीच्या डोक्यात स्टम्प मारला तसेच नायलाॅनच्या दोरीने गळा आवळून व हाताने गळा दाबून तिला ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – पत्नीवर संशय घेऊन त्यातून झालेल्या भांडणातून तिचा खून केल्याची घटना चाकण येथे शनिवारी (दि.4) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्योती वैभव काळे (वय.27, रा. चाकण) असे खून झालेल्या महिलेच नाव आहे. वैभव नरसिंग काळे (वय. 27, रा. आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गणेश नरसिंग काळे (वय 23, मूळ गाव अष्टुर, जिल्हा. नांदेड, सध्या चाकण) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती वैभव काळे यांने पत्नीवर संशय घेतला. संशयाच्या कारणावरून दोघांत भांडणं झाले याच भांडणातून आरोपीने स्वत:च्या पत्नीच्या डोक्यात स्टम्प मारला तसेच नायलाॅनच्या दोरीने गळा आवळून व हाताने गळा दाबून तिला ठार मारले. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.