Chakan Murder : वरातीत झालेल्या भांडणाचा शेवट खुनाने; कुख्यात आरोपीचा मृतदेह चासकमान कालव्यात फेकला

एमपीसी न्यूज : लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या (Chakan Murder) वादातून युवकाचा खून करण्यात आला. सहा युवकांनी मारहाण केल्यानंतर मयत युवकाला जीवे मारण्याच्या हेतूने चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आले. 

शंकर शांताराम नाईकडे (वय ४०, रा. कडधे, ता. खेड, पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, अवैध व्यवसाय केल्यावरून पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. बुधवारी (दि. २५ मे २०२२) रोजी रात्री साडेबारा नंतर घडलेल्या या घटनेतील मयताच्या शोधासाठी कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती कालवा प्रशासनाला केली आहे, अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी घटनास्थळावरून दिली.

Pune News : मुंढव्यात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एकाचा खून

वासुदेव बोंबले, पवन बोंबले (दोघेही रा. वेताळे, ता. खेड) व स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे (सर्व रा. कडधे, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या पत्नी सुषमा शंकर नाईकडे यांनी तक्रार नोंदवली आहे.

कडधे गावात (Chakan Murder) मंगळवारी दि. २४ मे रोजी पार पडलेल्या एक लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची, भांडणे होऊन त्याचे रूपांतर लगेचच मारामारीमध्ये झाले.

मयत शंकर याला गुन्ह्याची पार्श्वभूमी असल्याने गाव परिसरात त्याची दहशत होती. अधिक काही घडण्याअगोदार ठराविक युवकांनी एकत्रितपणे त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्यात तो निपचित पडला. त्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो, म्हणून त्याला एका वाहनात घालून गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिले, अशी हकीकत ग्रामस्थांनी सांगितली आहे. या खुनाचा तपास खेड पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.