Chakan: नांदी फौंडेशनतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – चाकण येथील नांदी फौंडेशनच्या ‘नन्ही कलीं’ प्रकल्पाच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी खेड पंचायती समितीच्या उपसभापती ज्योती आरघडे, हुतात्मा राजगुरू सोशल फौंडेशनच्या संचालिका शिल्पा भुरसे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना मांजरे, कार्यक्रम अधिकारी मनीषा सपकाळे, ऍड. अर्चना किर्लोस्कर, स्वाती त्रिभुवन, खेडचे बीओडी अजय जोशी, मुख्याध्यापिका कासार आदी उपस्थित होते.

महिलांनी मराठी, हिंदी गाण्यांवर नृत्य सादर केले. महाराष्ट्राची लावणी कार्यक्रमात रंगत भरून गेली. गरबा नृत्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली. याबरोबरच महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी भारतीय संस्कृती डोळ्यासमोर उभी केली.

भारतातील विविध भाषा, जाती धर्मावर आधारित गीतही महिलांनी सादर केले. महिलांनी महिला विषयावर कविता, भाषणांमधून आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन पूनम कानडे यांनी, तर आभार योगिनी शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.