Chakan: राष्ट्रीय महामार्ग की हक्काचा वाहनतळ?

एमपीसी न्यूज- पुणे- नाशिक महामार्गावर चाकण परिसरात सर्वत्र रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करून अपघातांना आमंत्रण दिले जात आहे. मात्र याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

पुणे- नाशिक महामार्गावर चाकण परिसरात आंबेठाण चौकातील पोलीस ठाण्यासमोर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा केला जात आहे. त्यामुळे शेकडो निरपराध नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

  • पोलीस प्रशासन या बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून दुचाकी वाहनावर तत्परता दाखविणारे पोलीस या वाहनांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.