Chakan : नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची एनडीआरएफने केली सुटका

एमपीसी न्यूज – नदीच्या पुरात एक तरुण दुपारपासून अडकल्याची घटना खालुंब्रे (ता. खेड) हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पत्रात शनिवारी (दि.१४) घडली. सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने या तरुणाची बोटीच्या साह्याने नदीच्या मध्यभागात जाऊन सुखरूप सुटका केली.

सुरेश लक्ष्मण धाबडघाव (वय २८, रा.केशवनगर, ता. रिसोड, जि. वाशीम) असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुण नदीच्या मध्यभागी कसा पोहचला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like