Chakan : मोटार सायकल बाजूला का घेतली, या कारणावरून पुतण्याला लोखंडी गजाने मारहाण

nephew was beaten with an iron bar for taking the motorcycle aside

एमपीसी न्यूज – मोटार सायकल बाजूला का घेतली, या कारणावरून चुलत चुलते यांनी पुतण्याला लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी गावात  गुरुवारी (दि.23) रात्री साडे सातच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी रोहित चंदुसिंग परदेशी (वय. 30, रा. वाकी खु, परदेशी वस्ती, ता. खेड, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलीसांनी याप्रकरणी सुनील जयसिंग परदेशी, राहुल कुंदन परदेशी, सुरज संजय परदेशी, जीवन दीपक परदेशी ( सर्व रा. वाकी खु, परदेशी वस्ती, ता. खेड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी हे फिर्यादी रोहित यांचे चुलत चुलते आहेत. आरोपी सुनील यांनी उभी केलेली मोटर सायकल बाजूला का केली याबाबत रोहित यांना जाब विचारला. यावरून झालेल्या वादातून आरोपी सुनील, सुरज व जीवन यांनी फिर्यादी रोहित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी सुरज यांने रोहितच्या डोक्यात लोखंडी गज मारला तसेच आरोपी राहुल यांने त्यांना दगडाने मारहाण केली. सर्व आरोपींनी फिर्यादी रोहित यांना शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.