Chakan News : हँगरला आडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून 82 हजारांची रोकड लंपास 

एमपीसी न्यूज – बंगल्याच्या मागच्या दरवाजाने बंगल्यात प्रवेश करुन हॅंगरला आडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून 82 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खेड तालुक्यातील भोसे याठिकाणी घडली. 

याप्रकरणी देवानंद किसन गव्हाणे (वय 36, रा. भोसे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंगल्यात मागच्या दरवाजाने प्रवेश केला. आत घुसून त्याने हॅंगरला आडकवलेल्या पॅन्टच्या खिशातून 82 हजारांची रोकड पळवली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.