Chakan News : चाकणमध्ये 22 हजार पोती कांद्याची आवक

एमपीसी न्यूज -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील (Chakan News) महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची  22 हजार पोती आवक होऊन  कांद्याला 800 ते 1200 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.  बटाट्याची 3500  पोती आवक होऊन बटाट्याला 800 ते 1400 रुपये दर मिळाला; नवीन गावरान बटाट्याला 800 ते 1100 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हा चिंतेमध्ये गेला होता. कांदा उत्पादकांना थोडीफार मदत करण्याचे हेतूने राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मते उत्पादन खर्चाचा विचार करता शासनाचे मिळणारे अनुदान तुटपुंजे आहे.

 

Pune Accident News : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला बावधन येथे अपघात; आठ जखमी

 

चाकणच्या बाजारपेठेमध्ये लाल गावरान कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  भारत देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या परिस्थितीमुळे सध्या कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. कांदा हा नाशवंत असल्यामुळे कांद्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही.

 

महाराष्ट्रातील कांदा हे नगदी पीक असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव हा अतिशय संवेदनशील भाग आहे. पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणावर कांदा मार्केट मध्ये येणार आहे. सध्या आवक होत (Chakan News) असलेला कांदा निर्यातक्षम असूनही अपेक्षित निर्यात होत नसल्याने दरातील घसरण सुरु असल्याचे शेतकरी व व्यापारी सांगत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.