Chakan News: खेड तालुक्यात 53 आणखी रुग्ण; उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

Chakan News: 53 more patients in Khed taluka; three died during treatment खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 53 नव्या रुग्णांमुळे 2 हजार 302 वर जाऊन पोहोचला आहे.

एमपीसी न्यूज- खेड तालुक्यात गुरुवार (दि.20) आणखी 53 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक म्हणजे सोळू येथील एका 40 वर्षीय व दुसऱ्या 54 वर्षीय कोरोना रुग्णाचा, राजगुरुनगर पालिका हद्दीतील 53 रुग्णाचा रुग्णालयांत उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील एकूण मृतांचा आकडा आता 59 वरून 62 वर जाऊन पोहोचला आहे. तर रुग्ण संख्या 2 हजार 249 वरून 2 हजार 302 वर जाऊन पोहोचली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गुरुवार सायंकाळी सात वाजेपर्यंत खेड तालुक्यात 12 गावे आणि तीन पालिकांमध्ये आणखी 53 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 53 नव्या रुग्णांमुळे 2 हजार 302 वर जाऊन पोहोचला आहे.

गुरुवारी सायंकाळी सातपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 23 रुग्ण मिळाले असून चाकण पालिका हद्दीत 13, राजगुरुनगर पालिका हद्दीत 9, आळंदी नगर पालिका हद्दीत 8 रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत मिळून आलेले 53 रुग्ण पुढील भागातील आहेत. मरकळ 5, धानोरे 5, चर्होली 5, मेदनकरवाडी 5, निघोजे 5, आंबेठाण 5, आखरवाडी 5, किवळे 5, चांदूस 1, बाहीरवाडी 1, तोरणे बुद्रुक 1, सोळू 2 असे एकूण ग्रामीण भागातील 23 रुग्ण मिळाले आहेत.

खेड तालुक्यातील नवीन 53 कोरोना रुग्णांमुळे आणि आणखी तिघांच्या मृत्यूने एकूण कोरोना रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे – एकूण कोरोना रुग्ण 2 हजार 302, डिस्चार्ज 1891, मृत्यू 62, सक्रिय रुग्ण 349 असल्याचे खेड तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खेड तालुक्यातील नगरपालिकांमध्ये असलेली कोरोना रुग्ण स्थिती पुढील प्रमाणे आहे…
आळंदी नगरपालिका – आजचे रुग्ण 8, एकूण 235, डिस्चार्ज 184, मृत्यू 8, सक्रिय रुग्ण ४३.

राजगुरुनगर नगरपालिका – आजचे रुग्ण 9, एकूण रुग्ण 260, डिस्चार्ज 202, मृत्यू 4, सक्रिय रुग्ण ५४

चाकण पालिका हद्दीत गुरुवारी सायंकाळपर्यंत 13 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. चाकण पालिकेने मात्र दिवसभरात 16 रुग्ण मिळाल्याचे सांगितले आहे.

चाकण पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार चाकण मधील कोरोना रुग्ण स्थिती पुढील प्रमाणे: आजचे रुग्ण 16, एकूण 472, डिस्चार्ज 355, मृत्यू 15, सक्रिय रुग्ण 102 आहेत. तर कोरोना रुग्णांच्या हायरिस्क संपर्कात 592 जण असल्याचे चाकण पालिकेकडून सांगण्यात आले.

चाकणमध्ये नव्याने मिळालेले 16 रुग्ण पुढील भागातील आहे. झीत्राईमळा 6, आंबेठाण रोड 2, धाडगे आळी 2, दावडमळा 1, एकतानगर 3, डोबामाळ 1, मार्केटयार्ड या भागातील असल्याचे चाकण पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खेड तालुक्यातील सोळू येथील 40 वर्षीय रुग्णाचा डी वाय पाटील पिंपरी येथे उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. तर सोळू याच गावातील 54 वर्षीय रुग्णाचा वायसीएम हॉस्पिटल येथे बुधवारी मृत्यू झाला आहे.

राजगुरुनगर पालिका हद्दीतील 53 वर्षीय रुग्णाचा गुंजकर हॉस्पिटल चिखली येथे मंगळवारी मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाचा उद्रेक सुरु असताना नागरिक अद्यापही मोठ्या संखेने घराबाहेर पडत आहेत. दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक मोठ्या संखेने खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून नये सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.