Chakan : दररोज विजांचा चमचमाट आणि  ढगांच्या गडगडाट…

एमपीसी न्यूज – चाकण मध्ये मागील आठवडाभरापासून दुपारच्या कडकडीत उन्हानंतर अचानक ढगांचे आक्रमण होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.  मागील पंधरवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा धडाकेबाज झलक द्यायला सुरुवात केली आहे. 

अपवाद सोडल्यास मागील आठवडाभरापासून जवळपास दररोज परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी (दि.२) पावसाने विश्रांती घेतली असे वाटत असतानाच सायंकाळी सात नंतर चाकण मध्ये सोसाट्याचा वारा,  वीजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट सुरु झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.