Chakan crime News : भागिदारीच्या व्यवसायाचे अमिष दाखवत एकाच कंपनीतील 5 जणांना 24 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – जिओ डिश डिलरशिपसाठी भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी आणि फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करुन जास्त रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने एकाच कंपनीत काम करणाऱ्या पाच जणांची तब्बल 24 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे. चाकण येथील कुरळी या ठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी रामकिसन महादेव केंद्रे (वय 41, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत जगन्नाथ गटकळ (वय 31, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामकिसन केंद्रे व त्यांचे सहकारी अशपाक शिरोळकर, विशाल कोले, दिनेश नागवडे, रामराज भेंडेकर हे कुरळी येथील विजय लॉजीस्टीक या कंपनीत काम करतात.

आरोपीने या सर्वांचा विश्वास संपादन करुन त्यांना जिओ डिश डिलरशिपचा भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यासाठी आणि फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करुन जास्त रिटर्स मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

या साठी त्याने वेळोवेळी या पाच जणांकडून 24 लाख 36 हजार 840 रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा अथवा डिलरशिप न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या पाचजणांनी पोलीसात धाव घेतली.

चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.