Chakan News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री आठ वाजता शेलपिंपळगाव येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

श्रीकांत भानुदास सकट (वय 40, रा. मातंगवाडा, मिरजगाव, ता. कर्जत,जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत यांचा भाऊ गोपीचंद भानुदास सकट (वय 43) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मयत भाऊ श्रीकांत हिरो होंडा दुचाकीवरून (एम एच 12 / सी जी 8607) जात होते. ते शेलपिंपळगाव येथील अक्षय ऑटो या शोरूम समोर आले असता भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात श्रीकांत यांच्या डोक्याला, तोंडाला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.