Chakan News: मोहितेवाडी येथील ओढ्याच्या पुलावरून एक दुचाकीस्वार वाहून गेला, मृतदेह मिळाला 

एमपीसी न्यूज – चाकण -शिक्रापूर महामार्गावर शेल पिंपळगाव हद्दीतील मोहितेवाडी (ता. खेड) येथील ओढ्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली. संबंधित घटनेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे काल (गुरुवारी) रात्री उशिरा उघड झाले.

जनार्दन मारुती डिंबर (वय 47, मूळगाव रामदासनगर, चिखली, ता. हवेली) असे संबंधित मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.